Kaakan Title Track Song Lyrics
जगण्याची आशा.. या मनाची भाषा..
तू न बोलता न ऐकता समजून घे ना..
स्वप्नांचे रंग.. मी तुझ्यात दंग..
उरे बाकी काय तुझी साथ संग असताना..
आकाशी चंद्र चांदण्या.. तोडून मी का आणल्या..
मनाचा पाळणा करू.. बांधुनी घे जरा झूला..
डोळ्यात तूच साजणी.. सुखाचा स्पर्श तू नवा..
तुझ्या वीना उरे न अर्थ जीवना..
उजळे तुझ्या हसुने कण कण..
अन चंद्र हे हातीचे काकण..भेटीला आणि तू नवी कहाणी माळून श्वासात ये..
लाटांची गाणी ती तुझी निशाणी मनात माझ्या उरे..
रंगवुनी टाक आयुष्य माझे सुर तुझे साद दे..
पहाट ओली ती तुझ्या उषाशी.. रातीला आवाज दे..
येइन आता मी उराशी आशाही जाण्याची वेळ नको..
ओढ़ तुझी माझ्या लागे जीवा रे जीवाशी खेळ नको..तू अशीच ये ना.. नी मिठीत घे ना..
जग धुंद धुंद नको पाश बंध कुठलाच आता..
दे हातात हात.. जरी दूर वाट..
भीति नाही आज.. तुझी संग साथ असताना..
आकाशी चंद्र चांदण्या.. तोडून मी का आणल्या..
मनाचा पाळणा करू.. बांधुनी घे जरा झूला..
डोळ्यात तूच साजणी.. सुखाचा स्पर्श तू नवा..
तुझ्या वीना उरे न अर्थ जीवना..
उजळे तुझ्या हसुने कण कण..
अन चंद्र हे हातीचे काकण..
Kaakan Wedyanche Ghar Unhat Song Lyrics
आकाशाच्या छत्रीखाली गाणं गात गात
तुझ्या माझ्या माझ्या तुझ्या वेड्यांच् घर उन्हात
पाऊसपाण्याची छत्रीला भीति काय
तुझं माझं नातं दुधावर साय..
आकाशाच्या छत्रीखाली गाणं गात गात
तुझ्या माझ्या माझ्या तुझ्या वेड्यांच् घर उन्हातऊन असो वारा असो उरली आता चिंता ना कशाची
तुझी मिलाता सोबत बदलू सारी ही कहाणी जगण्याची
वेगळी वाट ही अबोल जरी साथ
चार पावलात दिवस रात
आकाशाच्या छत्रीखाली गाणं गात गात
तुझ्या माझ्या माझ्या तुझ्या वेड्यांच् घर उन्हातनातं असं गोड जसं दुधात साखर थोड़ी मायेची
बंध कसा हां गहिरा आपल्यालाच ज्याची ही गोडी
बाकीच्या कुणाला कळणार नाही बात
जगा परे अशी आपुली साथ
आकाशाच्या छत्रीखाली गाणं गात गात
तुझ्या माझ्या माझ्या तुझ्या वेड्यांच् घर उन्हात
Nice blog
ReplyDelete